मुंबई

Panvel News : पत्रकार उत्कर्ष समिती गुहागर आयोजित मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप शिबिर संपन्न डॉ. दिनेश साळवी यांचे महत्त्वाचे योगदान

पनवेल जितिन शेट्टी : पत्रकार उत्कर्ष समिती व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती गुहागरच्या वतीने वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे येथे मोफत डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला .

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मराठी पत्रकारितेचे प्रणेते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

पत्रकार उत्कर्ष समिती गुहागर अध्यक्ष डॉ. दिनेश साळवी , सदस्य चंद्रकांत काष्टे, सुनील बोले , अंकुश पागडे , हिरालाल मोरीस, महिला उत्कर्ष समिती रत्नागिरी उपाध्यक्ष सौ दीप्ती साळवी , गुहागर तालुकाध्यक्ष सौ सुवर्णा पागडे , सचिव विना काष्टे, समीक्षा बोले, वर्षा संसारे अनुपमा पोरे यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अशोक घाडगे , विजन ऑप्टिकल चिपळूणचे नेत्र तंत्रज्ञ यासिन कोठावळे यांनी या शिबिराची धुरा व्यवस्थित रित्या सांभाळात शृंगार तळी , पालपेने विभागातील जवळपास 200 हून अधिक व्यक्तींची तपासणी करून चष्म्याचा नंबर काढून दिला तसेच अल्प दरात चष्मे वाटप सुद्धा केले. गुहागर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावंत हे विशेषरित्या या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी त्यांनीं उपस्थितांना सायबर क्राईम या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीच्या गुहागर उपाध्यक्षपदी सौ सुरभी भोसले यांची निवड करण्यात आली तसेच सौ सुवर्णा पागडे यांची महिला उत्कर्ष समितीच्या गुहागर अध्यक्षपदी फेरनिवड जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणाऱ्या तसेच संस्कृती आणि संस्कार बालमनावर रुजावेत व भविष्यातील सुजाण देशभक्त नागरिक तयार व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणेचे शिक्षक व कर्मचारी यांना पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0