Panvel News : यशश्री-अक्षता यांना न्याय मिळावा यासाठी आरपीआयतर्फे जाहीर निषेध ; राजाराम खरात
Panvel Latest News: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके) यांचा यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी निषेध मोर्चा
पनवेल जितीन शेट्टी : यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे Akshata Mhatre Murdeयांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी करत ( 8 ऑगस्ट ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके) च्या वतीने पनवेलमध्ये निदर्शने करण्यात आली आहे.दोन्ही मुलींना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. RPI अध्यक्ष राजाराम खरात, संपर्क प्रमुख दिपक मदने यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार व अधिकारी याठिकाणी जमा झाले व घटनेचा निषेध केला. अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्या दोन्ही मुलींवरही जो अत्याचार झाला आहे, त्यामुळे यशश्री आणि अक्षता यांना न्याय मिळाला पाहिजे. नराधमांना अशी शिक्षा झालीच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नेमके अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्या प्रकरण काय?
अक्षता म्हात्रे यांचे घरामध्ये भांडण झाल्यानंतर शिळफाटा येथील डोंगरात असलेल्या मंदिरात जाऊन ही विवाहित तरूणी बसली होती. बराच वेळ मंदिरात बसलेल्या तरूणीला एकटी पाहून मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी तिला चहामधून गुंगीचे औषध दिले. यानंतर त्या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
यशश्री आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यामध्ये 3 ते 4 वर्षांपासून मैत्री होती. यशश्री उरणमध्ये जिथे ठिकाणी राहत होती तिथेच दाऊद देखील राहायचा. पण 2019 मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी दाऊद विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा दाऊद जेलमध्येही गेला होता. त्यानंतर तो कर्नाटकला गेला. दाऊद पुन्हा उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीशी फोनद्वारे संपर्क केला. त्यावेळी दोघांनी भेटायचं ठरवलं होतं. या भेटीवेळी यशश्रीने लग्नाला नकार दिला त्यामुळे चिडलेल्या दाऊदने तिची हत्या केली.