Sanjay Raut : राज ठाकरे यांच्या वाहनांवर सुपारी फेकणारे शिवसैनिक असू शकतात परंतु पक्षाचा काही संबंध नाही ; खासदार संजय राऊत
Sanjay Raut On Raj Thackeray Beed Incident : शिंदेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर लोटांगण घालून बसवले ; खासदार संजय राऊत
मुंबई :- बीडमध्ये शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांचा ताफा अडवून काही आंदोलकांनी सुपाऱ्या फेकल्या. हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात होते. यावरूनच संजय राऊत Sanjay Raut यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाशी संबंध नाही. आंदोलन करणे ही पक्षाची भूमिका नव्हती असे ते म्हणाले. ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्या ताफ्यावर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू शकतात मात्र त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. मराठा समाजाच्या लोकांचा त्यात सहभाग असू शकतो. राज ठाकरे यांच्या विधानानंतर तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध केला. मराठा समाजाचे आंदोलन हे पक्षविरहित आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे निघाले. त्यामध्ये सर्व पक्षांतील लोकांचा सहभाग होता. कदाचित बीडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असेल म्हणून तिथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. मात्र ते मराठा समाजाचे आंदोलन होते. त्या आंदोलनाचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यात आमचे कार्यकर्ते नसतील असे मी म्हणत नाही. मात्र ती आमच्या पक्षाची भूमिका नव्हती”, असा पुनरुच्चार राऊतांनी केला. Maharashtra Political Latest News
तसेच “ते आंदोलन कोणी केले हे महत्त्वाचे आहे. आम्हाला याबाबत धमकी देण्याची गरज नाही. त्या धमक्या भाजप, फडणवीस, महाराष्ट्र द्रोहींना द्या. राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील राजकारण बिघडवले जात आहे. ते पाहता सर्वच राजकीय पक्षांनी संयम पाळणे गरजेचे आहे”, असा सल्ला राऊतांनी दिला आहे. Maharashtra Political Latest News
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांकडून लोटांगण घालण्यासाठी ठाकरे गेले होते अशी टीका केली जात आहे. त्यावरून राऊतांनी जोरदार पलटवार केला आहे. राऊत म्हणाले, “शिंदेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर लोटांगण घालूनच बसवलेले आहे. गेल्या साठ वर्षांत कोणतेही मुख्यमंत्री दिल्लीला गेले नसतील तेवढे हे एक मुख्यमंत्री लोटांगण घालायला गेले. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे दिल्लीत लोटांगण घालायला गेले होते का? उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्या जुलमी कारभाराशी दिलेली झुंज लोटांगण नव्हे स्वाभिमान होता. आज राज्यकर्ते दिल्लीच्या दारातील पायपुसणे होऊन बसलेत त्याला लोटांगण म्हणतात. ज्यांनी पक्ष, चिन्ह चोरले त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्हाला दिल्ली चांगली माहित आहे”, असे राऊत म्हणाले. Maharashtra Political Latest News