Sanjay Raut : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला नाही… खासदार संजय राऊत
•मुंबई 16 ऑगस्ट ला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा मेळावा होणार असल्याचे Sanjay Raut त्यांनी सांगितले
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. तिन्ही पक्ष एकत्र याबाबत निर्णय घेतील असे म्हणाले आहे. तसेच येत्या 16 तारखेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा मुंबईत मेळावा होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील खोके सरकारला घालून भाजपाला हद्दपार करायचे तसेच राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचे सूत्रधार भाजप, शहा आणि फडणवीस आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल. महाविकास आघाडीचा लोकसभेत चांगला निकाल आला. त्यांनतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांकशी चर्चा करण्यासाठी ते गेले होते. यावेळी सर्वच बड्या नेत्यांशी चर्चा झाली. आता या भेटीचे फलित म्हणजे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. तीन पक्षात प्रेमाचे वातावरण आहे”, असे राऊत म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांचे काही वेगळे मत असू शकते खरे तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्यांचाच मुख्यमंत्री असेल असे महाविकास आघाडीचे सूत्र असल्याचे विधान केले आहे. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत हा दावा खोडून लावला आहे. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचे काही वेगळे मत असू शकते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. निवडणुकीत राज्याला एक चेहरा द्यावा लागतो. विरोधक आणि सत्ताधारी दोघांकडे तो चेहरा असावा लागतो. मात्र महाविकास आघाडीमध्ये अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. तिन्ही पक्ष एकत्र मिळून निर्णय घेतील”, असे राऊत म्हणाले.