क्राईम न्यूजमुंबई

नवी मुंबई ; गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai Police Seized Gutkha : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 यांची कारवाई, गुटखा, पान मसाला,तंबाखूजन्य पदार्थ साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या आवळल्या मुसक्या

नवी मुंबई :- पोलीस आयुक्त मिलिंद भाबंरे Navi Mumbai CP milind bhamare यांनी नवी मुंबई नशा मुक्त Navi Mumbai drugs Free Campaign करण्याकरिता अवैधरित्या तंबाखू, अंमली पदार्थ, विक्री-साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष -2 यांनी छापेमारी करत गुटखा विक्रेत्याच्या Gutkha Dealer मुसक्या आवळल्या आहे. गुटखा विक्रेत्याकडून जवळपास दहा लाख 27 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांना छापेमारी आढळून आले आहे. Navi Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उप आयुक्त अमित काळे, गुन्हे शाखा नवी मुंबई यांना घोडगाव, पनवेल येथे मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीसाठी आणून त्याचा साठा केल्याची बातमी मिळाली होती. त्वरित गुन्हे शाखा कक्ष -2 पथक रामू गीनू पाटील, घोटगाव येथे छापेमारी करत पोलिसांनी चाळीच्या घरात असलेल्या दहा लाख 27 हजार किंमतीचा गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखूचा साठा करणाऱ्या आरोपी मोहम्मद आबीद मोहम्मद खालीद खान याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी याच्यावर महाराष्ट्र शासन गुटखा विक्री मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 223,274,275,123 सह अन्नसुरक्षा मानके अधिनियमन 2006 मधील कलम 26(2),(आय26),(2),(आय व्ही) व कलम 27,(2),(ई59),(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-2 करत आहे. Navi Mumbai Latest Crime News

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

नवी मुंबई पोलिसांची कारवाई

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे Navi Mumbai CP milind bhamare पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमित काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांनी नवी मुंबई नशा मुक्त करण्याचे अंमली पदार्थ सेवन गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू सेवन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे.अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांना घोटगाव, परिसरात अवैध गुटखा साठा आणि विक्रीबाबत बातमी मिळाली होती.गुन्हे शाखा 2 कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार निलेश पाटील, दिपक डोंगरे, रुपेश पाटील, पोलीस शिपाई अजिनाथ फुंदे या पथकाने छापेमारी करत आरोपीला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0