Thane Crime News : ठाण्यात पानटपरी व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
•Thane Crime News सिगारेट न दिल्याचा राग मनात धरून, पानटपरी व्यवसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
ठाणे :- सिगारेट न दिल्याचा राग मनात धरून या किरकोळ कारणावरून पानटपरी व्यवसायिकाला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ठाण्याच्या आझादनगर परिसरात झाला आहे. मारहाणीत पानटपरी व्यवसायिक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. याबाबत पानटपरी व्यवसायिकाच्या मुलाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेतील आरोपी अनिकेत लक्ष्मण गायकवाड (24 वर्ष,रा.आझाद नगर, कोलशेत रोड, ठाणे) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आझाद नगर, कोलशेत रोड येथे विष्णू मनोहर कवटीकवार यांचे पानटपरीचा व्यवसाय आहे. रात्रीच्या सुमारास आरोपी अनिकेत लक्ष्मण गायकवाड (24 वर्ष) याने विष्णू यांच्याकडे सिगारेटची मागणी केली, परंतु अनिकेतला सिगारेट देण्यास नकार दिला. हाच राग मनात धरून अनिकेतने लाकडी बांबूने डोक्यावर व पायावर मारहाण करून गंभीररित्या जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घडलेल्या घटनेवर विष्णू यांचा मुलगा महेश कवटीकवार याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात वडिलांना झालेल्या मारहाणीबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी महेशच्या तक्रारीवरून आरोपी अनिकेत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109,115(2),352,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस एस शेळके करीत आहेत.