MNS Ramdas Patil : आरोपीना भर चौकात फाशी द्या – मनसे तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील
पनवेल जितिन शेट्टी : उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख ,नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे Akahsta Murder हत्याकांडातील आरोपीना भर चौकात फाशी द्यावी जेणेकरून महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस कोण करणार नाहीत अशी मागणी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील MNS Ramdas Patil यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना निवदेन देण्यात आले . Panvel Latest News
शासनापर्यंत जनसामान्यांच्या प्रतिक्रिया पोहचाव्या जेणेकरून शासन तज्ज्ञ असे सरकारी वकील देऊन यशश्री शिंदे आणि नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार,हत्याकांडाबाबत आरोपीना लवकरत लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि हि फाशी भर चौकात देण्यात यावी ज्यामुळे भविष्यात आपल्या माता भगिनींवर असे प्रकार करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही असे मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी यावेळी सांगितले. Panvel Latest News
याबाबत पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी यावेळी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली या मोर्चाप्रसंगी मनसे कोकण संघटक संजय तन्ना,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदिती सोनार उपाध्यक्ष मनीषा पाच भाई रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर पनवेल तालुका सचिव अमोल पाटील,उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी तालुका उपाध्यक्ष चिंतामणी मुंगाजी, अभिजित घरत, स्वरूपा सुर्वे मनसे नेते अतुल चव्हाण यासह महिला पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Panvel Latest News