क्राईम न्यूजमुंबई

Thane Fraud News : ऑनलाईन आर्थिक फसवणूक : ऑनलाइन टास्क देऊन 2.62 लाखांची फसवणूक

Scammer Scam Person Using Online Task Fraud : ऑनलाईन टास्क देत योगा टीचरला गंडा! सायबर भामट्यांनी केली 2.62 लाखांची फसवणूक

ठाणे :- टेलिग्रामवरून ऑनलाईन टास्क Telegram Online Task देऊन अनेकांच्या आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक Online Fraud झालेल्या असताना, त्यात आणखी भर एका योगा टीचरची पडली आहे. सायबर भामट्यांनी या योगा टीचर असलेल्या महिलेची ऑनलाईन टास्कसाठी आर्थिक आमिष दाखवून तब्बल 2.62 लाखांना गंडा घातला आहे. याबाबत महिलेने राबोडी पोलीस ठाण्यात Rabodi Police Station फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादवरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Latest Cyber Crime News

तक्रारदार, महिला योगा टीचर असून त्यांना टेलिग्राम वर Amazon India benefits working group यामध्ये ॲड केले होते. ऑनलाईन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगले पैसे परताव्यापोटी मिळतील, असे सांगितले. चोरट्यांनी वेळोवेळी त्याच्याकडून ऑनलाईन पद्धतीने 2 लाख 62 हजार रुपये घेतले. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात Cyber Criminal भारतीय न्याय संहिता कलम 2000 चे कलम 66(क),66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खणकर हे करत आहे. Thane Latest Cyber Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0