Sawan Somwar 2024 : श्रावण महिन्याचा पहिला श्रावणी सोमवार..
Sawan Somwar 2024 : श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि 2 सप्टेंबर 2024 रोजी संपेल
मुंबई :- हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. यावर्षी महाराष्ट्रात पवित्र श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि 2 सप्टेंबर 2024 रोजी संपेल. Sawan Somwar 2024 श्रावण महिना भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा विशेष फलदायी असते. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवार पासूनच होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत. या महिन्यात शिवाचा महारुद्रभिषेक करावा. नियमित व्रत करावे. शिवाचा अभिषेक करत 108 वेळा रोज बेल वाहावे.” Sawan Somwar 2024
श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते. Sawan Somwar 2024