Dombivli Crime News : रिक्षा स्टॅडवर रांगेत रिक्षा लावण्याच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या..
•Dombivli Crime News : रिक्षा स्टॅडवर रिक्षा लावण्याच्या वादातून रिक्षाचालकाचा भर चौकात मर्डंर..
डोंबिवली :- ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याणसह अन्य परिसरात रिक्षा चालतात. अनेक वेळा रिक्षाचालकांची दादागिरी आणि त्यामुळे भांडण होत असतात. या स्टँडवर प्रवाशांसह रिक्षाचालकांची नेहमीच वर्दळ असते.डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील एका रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला.सुनील राठोड याने रिक्षात लपवलेला लोखंडी रॉड काढून अविनाश कांबळे याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडच्या साह्याने अविनाशच्या डोक्यात रॉड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या स्टॅड वर रिक्षा चालक अश्विन बजरंग कांबळे (28 वर्ष) आणि सुनील गोपाळ राठोड (35 वर्ष ) या दोन रिक्षा चालकांमध्ये रिक्षा स्टॅडला नंबर लावण्यावरून वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरून सुनील राठोड यांने अश्विन कांबळे याचा एमआयडीसी रोड डोंबिवली पूर्व पाठलाग करून त्याच्या डोक्यात लोखंडी रोडने भर चौकात मारले. या भांडणामध्ये अश्विन कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भातची तक्रार मयत अश्विन याच्या भावाने म्हणजेच आकाश बजरंग कांबळे यांनी टिळकनगर पोलिसांना फिर्याद दिली होती. पोलिसांनी आकाशच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील राठोड याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम हे करत आहे.