मुंबई

Panvel Crime News : पैसे न दिल्याने जीवे ठार मारणार्‍या चौकडीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल : पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरुन सदर इसमास हाताने बांबू, रॉडने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करून त्यात तो मयत झाल्याप्रकरणी चार फरार आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


आसाराम अर्जुन वाकले (28 रा.करंजाडे) हा जेवण करण्याकरिता करंजाडे परिसरातून जात असताना आरोपी दुर्गा सुरेन (25 रा.करंजाडे), महती सुंडी (45 रा.करंजाडे), बिरेन देवगम (25 रा.करंजाडे) व दिनेशकुमार कोरी (26 रा.करंजाडे) यांनी त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन त्याचा राग मनात धरुन या चौकडीने त्याला  हाताने बांबू, रॉडने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करून त्यात तो मयत झाला होता. यानंतर ही चौकडी पसार झाली होती. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य पाहून परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या आदेशाने वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे बाळकृष्ण सावंत, पो.नि.प्रवीण भगत यांच्यासह तपास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पो.हवा.इंद्रजित कानू, शिंदे, गडगे, पाटील, गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने याबाबत परिसरात तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार आदींच्या आधारे या आरोपींची माहिती घेतली असता ते वेगवेगळ्या ठिकाणी लपल्याचे निष्पन्न झाल्याने या आरोपींना त्या-त्या ठिकाणांवरुन ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0