Panvel Rural Hospital Latest Update : दोनच दिवसात होणार अंमलबजावणीस सुरुवात
पनवेल : शिवसेनेने पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाचे Panvel Rural Hospital प्रवेशद्वार दुसर्या बाजूने सुरू करण्याबाबत मागणी करताच रुग्णालय प्रशासनाने त्वरित मागणी मान्य करत हॉस्पिटलच्या मुख्य दरवाज्याचा आणि भविष्यात पलीकडच्या बाजूकडून प्रशस्त प्रवेशद्वार सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
सध्याचे पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात येण्यास शिवसेना पक्ष व पक्षाचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांचा सिंहाचा वाटा आहे परंतु या रुग्णालयाचे आत्ताचे प्रवेशद्वार हे ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहाकडे जाणार्या रस्त्यावरती उघडते तिथे प्रत्यक्षात आठ ते दहा मोठ्या रहिवासी इमारती असून रुग्णालय परिसरात होणारी रुग्णांची, नातेवाईकांची गर्दी , पोलीस, म्बुलन्स, रिक्षा यांचे होणारे ट्रॅफिक, अनेक गुन्ह्यांमधील गुन्हेगार किंवा मयत झालेल्या लोकांचे पोस्टमार्टम इत्यादीमुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, भांडण तंटे यामुळे रहिवाशांना भीतीचे वातावरण निर्माण होते.
लोकसभा प्रचारादरम्यान शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा मा. नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या ही गोष्ट रहिवाशांनी लक्षात आणून दिल्यानंतर प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकार्यांनी जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन श्री अंबादास देवमाने व रुग्णालय अधीक्षक श्री बालाजी फाळके यांची भेट घेऊन रुग्णालयाचे प्रवेशद्वार पलीकडच्या निर्जन रस्त्यावरून करण्याची मागणी केली व तात्पुरत्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या मुख्य रस्त्यावरील गेटचा वापर करण्याची ही सूचना दिली. त्यानुसार त्वरित कारवाई करत रहिवाशांना गैरसोय होणारे प्रवेशद्वार दोन-तीन दिवसात बंद करून मुख्य प्रवेशद्वाराच्या वापर करण्याच्या सूचना देवमाने यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या व दिवसातील काहीच तास किंवा गरज पडेल तेव्हाच ज्येष्ठ नागरिक संघ पथवरील प्रवेशद्वार उघडण्याबाबत सांगितले व लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निर्जन रस्त्यावरून नवीन गेट तयार करून तिथून कायमस्वरूपी एंट्रन्स करण्याचे ही मान्य केले. सोसायटी सदस्यांची ही या संदर्भात एक बैठक घेऊन त्यांच्या सूचना घेण्यात आल्या. अतिशय त्वरित या विषयाचा निकाल दिल्यामुळे जनतेने शिवसेनेचे आभार मानले. शिवसेना महानगर संघटक श्री मंगेश रानावडे यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचा विषय काढून आवश्यक पडेल तेव्हा बाह्य रुग्णांना देखील मोफत किंवा माफक दरात या हॉस्पिटलमधून रक्तपुरवठा व्हावा असे निवेदन दिले व त्यावरही ताबडतोब श्री देवमाने यांनी योग्य ते आदेश देऊन शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे आता बाह्य रुग्णांना देखील याच उपजिल्हा रुग्णालयातून रक्तपुरवठा मिळणार असल्याचे निश्चित झाले.
यावेळेस शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री यादव, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महिला जिल्हा संघटिका रीना पाटील, महानगर संघटक मंगेश रानावडे, महिला तालुकाप्रमुख मंदा जंगले, उपमहानगरप्रमुख महेश सावंत, उप महानगरप्रमुख सचिन मोरे, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, तळोजा विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, शैलेश जगनाडे, विभाग प्रमुख श्याम देशमुख, किरण पवार, तोफिक बागवान आदी उपस्थित होते.