महाराष्ट्रपुणे
Trending

Kalamandi Exhibition | महिला सशक्तीकरणाचे प्रतीक ठरतंय ‘कलामंडी’

  • ‘माती से’ संस्थेकडून आयोजित ‘कलामंडी’ प्रदर्शनाचे अपर्णा अमितेश कुमार यांच्याहस्ते उदघाटन
  • महिला सशक्तीकरणासाठी अमृता गोयल यांचा पुढाकार

पुणे, दि. २ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : Kalamandi Exhibition |

स्थानिक महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्या सशक्तीकरणासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून ‘कलामंडी’ प्रदर्शन (Kalamandi Exhibition) पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. आज दि. २ ऑगस्ट रोजी पुना क्लब Poona Club, कॅम्प येथे अपर्णा अमितेश कुमार यांच्याहस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.

अपर्णा अमितेश कुमार व अमृता अतुल गोयल.

अमृता अतुल गोयल यांनी ‘माती से’ संस्थेच्या माध्यमातून ‘कलामंडी’ प्रदर्शन आयोजित करून महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले आहे. ‘कलामंडी’ प्रदर्शनात स्थानिक उद्योजक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सदर प्रदर्शनाला दि. २ व ३ रोजी पुणेकरांना भेट देता येणार आहे.

अपर्णा अमितेश कुमार या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar यांच्या पत्नी आहेत. सोबतच त्या केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (सीबीएफसी) च्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. तसेच घटनात्मक कायदेतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. अपर्णा कुमार सक्रिय समाजसेविकेची भूमिका बजावत असून अनाथाश्रम, वृद्धाश्रमासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

कलामंडी?

कलामंडी म्हणजे “आर्ट मार्केट” हे ‘माती से’ चे राखी-थीम असलेले प्रदर्शन आहे. यामध्ये दागिने, कपडे, होम डेकोर, लिनन्स, राख्या, भेटवस्तू, खवय्ये पदार्थ, स्किनकेअर, ड्राय फ्रूट्स आणि बरेच काही यासारखी विविध उत्पादने आहेत.

User Rating: Be the first one !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0