छ.संभाजी नगर

Ambadas Danve : राज्यात काय रझाकारी आहे का? असा सवाल राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगराच्या दौऱ्यावर असल्याने पोलीस भरती स्थगित केल्यामुळे Ambadas Danve संतापले

छत्रपती संभाजीनगर :- राज्यात रझाकरी चालू आहे का? असा सवाल उपस्थित करत अंबादास दानवे यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असल्याने कडे कोट बंदोबस्ता करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मनुष्य अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस भरती रद्द करण्यात आल्याने अंबादास दानवे हे संतप्त झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात त्यांच्या हस्ते महिलांसाठी विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे. जळगाव रोड वरील दहा किलोमीटर परिसरातील वाहतूक यामुळे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना 40 किलोमीटर जास्तीचा फेरा पडणार आहे. त्यातच आता पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना ऐनवेळी भरती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा आधीच ठरलेला असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांना हा निरोप का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विरोधी पक्ष नेते Ambadas Danve काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. या संबंधी ते म्हणाले की, मी पोलिस आयुक्तशी बोललो. त्यांनी मनुष्य बळाअभावी भरती रद्द केल्याचे कबुल केले आहे. मात्र अडीच हजार विद्यार्थी येतात, त्यांचे येणे – जाणे, राहणे खाणे, प्रवास खर्च होतो, त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मनात आल्यानंतर ऐनवेळी भरती रद्द केल्याची एक नोटीस लावण्यात येते. हे योग्य नाही. ही काय रझाकारी आहे का? पोलिस आयुक्तांच्या घरचे राज्य आहे का? मला असे वाटते की हा अडीच हजार विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0