Thane Tadipar News : तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
•सहा महिन्याच्या कालावधी करिता तडीपार केलेला आरोपी सात दिवसातच पुन्हा शहरात वावर, आरोपीकडे हत्यार
ठाणे :- शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या पथकाने मनाई आदेश भंग करणाऱ्या एका तडीपार आरोपीला अटक केली आहे. सहा महिन्याच्या कालावधी करिता जिल्ह्यातून हद्दपार केले होते. परंतु तडीपार आरोपी मनाई आदेश जुगारून केवळ सात दिवसात शहरात पुन्हा हजर झाला होता.अटक तडीपार आरोपीचे नाव जावेद सलीम खान उर्फ डीजे (29 वर्ष) असे असून तो ठाकूरपाडा दहिसर येथे राहणार आहे. तसेच पोलीस पथकाने त्याला अटक केली त्यावेळी त्याच्याकडे एक सुरा सापडला आहे.
आरोपी जावेद याला 24 जुलै 2024 अन्वये पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 ठाणे, यांनी सहा महिन्याच्या कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते. परंतु,केवळ सात दिवसातच आरोपी जावेद यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ -05 यांची कोणतीही परवानगी न घेता शहरात वावर चालू होता.शिळ डायघर पोलिसांच्या पथकाला आरोपी हा उत्तम शिव स्मशानभूमी जवळ सुरा घेऊन असल्याचे माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली असून त्याच्या विरुद्ध फिर्यादी देऊन भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मनाई आदेश भंग करणाऱ्या तसेच बेकायदेशीर रित्या सुरा बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहे.