Thane Crime Branch News : ठाणे पोलीस : अट्टल चोरटा गुन्हे शाखाच्या ताब्यात
Thane Crime Branch Arrested Criminal : महाराष्ट्र, गुजरात सराईत गुन्हेगार असलेल्या अट्टल चोरास पोलिसांनी केले अटक, चोरटा घरफोडीमध्ये माहिर
ठाणे :- महाराष्ट्र, गुजरात राज्यात चोरी करणाऱ्या एका अट्टल Criminal चोरास ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा-5, Thane Crime Branch Police वागळे इस्टेट यांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे कडून 7 गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपी हा घरफोडीमध्ये Gharphodi माहीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Thane Crime Latest News
श्रीनगर पोलीस ठाणे Srinagar Police Station येथे भादवी कलम 454,457,380 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक-5 कडून सुरू होता. गुन्हे शाखा घटक -5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती. या गुन्ह्यातील आरोपी हा सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी कामगार नाका, वागळे इस्टेट ठाणे येथे येणार असल्याची खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती. बातमी मिळतात पोलीस उपनिरीक्षक तुषार माने आणि पोलीस पथकाने ठाण्याच्या कामगार नाका येथे सापळा रचून श्रीनगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली (41 वर्ष,रा. मिरा रोड) असे असून आरोपी हा मूळ त्रिपुरा येथे राहणार आहे. आरोपी मोहम्मद याला श्रीनगर वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून 1 लाख 13 हजार 100 रुपये किमती सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच, पोलिसांच्या तपासात आरोपीच्या विरोधात श्रीनगर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात 07 गुन्ह्याची नोंद असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र सह गुजरात राज्यातही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने हे करत असून पोलिसांकडून आरोपीच्या साथीदारांचाही शोध घेतला जात आहे. Thane Crime Latest News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 (गुन्हे) शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, अविनाश महाजन, पोउपनि तुषार माने, पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, पोलीस हवालदार सुनिल निकम,विजय काटकर, रोहीदास रावते, सुशांत पालांडे, विजय साबळे, महिला पोलीस हवालदार मिनाक्षी मोहीते, माधव वाघचौरे, पोलीस नाईक तेजस ठाणेकर,रघुनाथ गार्डे, पोलीस शिपाई यश यादव या पथकाने केली आहे. Thane Crime Latest News