Keshav Upadhye : मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करा, उद्धव ठाकरे यांनी आरक्षणावर गोल गोल बोलू नये ; भाजप प्रवक्ते केशव उपाध्य
•मराठा आंदोलन रमेश केरे पाटील यांचे मातोश्री बाहेर आंदोलन, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ठाकरे यांची पत्रकार परिषद
मुंबई :- मातोश्री बाहेर मराठा आंदोलन रमेश केरे पाटील यांनी आंदोलन केले होते. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत मराठा समाजाने काल मातोश्री बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर आंदोलक रमेश केरे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि भेटीनंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण हे राज्यात न सुटणार असून ते केंद्र सरकारच सोडू शकतं असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करावी. तसेच, मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच सुटू शकतो असं दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेवरच आता भाजपा कडूनही प्रतिक्रिया येऊ लागले आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी नुसते गोल गोल बोलू नये असे आव्हान उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मराठा मोर्चाच्या ही खिल्ली उडवण्याचा आरोप ही देखील उपाध्ये यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक म्हणजे उद्धव ठाकरे हेच आहे असे उपाध्ये म्हणाले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाबाबत कोणतीच भूमिका घेतली नाही यावरून आता भाजपने ठाकरे गटावर प्रतिहल्ला केला आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हणाले की,
मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उध्दव ठाकरेच ; केशव उपाध्ये
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता व न्यायालयात टिकणारे असे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भाजपाची भूमिका पण उध्दव ठाकरे हे मराठा आरक्षण कसे मिळावे यावर बोलायला तयार नाहीत.
मराठा मोर्चाची खिल्ली उध्दव ठाकरे यांच्याच मुखपत्रातून करण्यात आली
मराठा आंदोलकांना मारहाण उबाठाच्या नेत्यांनी केला
मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायलयात उध्दव ठाकरे मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत
मराठा आरक्षणसाठी राज्य सरकारने बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर उबाठाचा बहिष्कार
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार
आता तरी मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करा नुसत गोल गोल बोलू नका…