IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब
Delhi Court to hear anticipatory bail plea of trainee IAS Pooja Khedkar today : पूजाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांना दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे ती संरक्षणाची मागणी करत आहे. पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
ANI :- पटियाला हाऊस कोर्टात प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या खटल्यात नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे या खटल्याची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
पूजाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांना दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे ती संरक्षणाची मागणी करत आहे. पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उद्या सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे.
UPSC च्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांच्याकडे अमाप संपत्ती असल्याचा आरोप आहे.