Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब घेतली भेट
Devendra Fadnavis Meet PM Modi With Family : देवेंद्र फडणवीस दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला सहकुटुंब उपस्थिती
नवी दिल्ली :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. रविवारी (28 जुलै) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस, आणि मुलगी दिविजा ही उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील 13 मुख्यमंत्री आणि 15 उपमुख्यमंत्री उपस्थित होते. दिल्ली येथे दोन दिवसा करिता म्हणजे शनिवार आणि रविवार करिता भाजपच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही उपस्थिती लावली होती. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकुटुंब भेट घेतली. या भेटीत नंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमी प्रेरणादायी ठरते त्यांच्या भेटीतून अनेक वेळा मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे त्यांना भेटल्यानंतर एक ऊर्जा निर्माण होते असं देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले होते.