Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे “खलनायक”आहे खासदार संजय राऊत यांचा आरोप
•शिवसेना ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला
मुंबई :- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी काही दिवसांपूर्वी धक्कादायक खुलासा केला होता. यामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला जात होता. या सर्व प्रकरणावर आता खासदार संजय राऊत यांच्याकडूनही देवेंद्र फडवणीस यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खलनायक असे म्हटले आहे. समित कदमांचा आयएस एस आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच अनिल देशमुख यांच्यावर आरोपानंतर समित कदम यांनी पुढे येत त्यावेळी काय घडले होते याचा खुलासा केला
खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधला
राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “हा सदगृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार भेटत राहिला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा असे अनिल देशमुखांना सांगण्यात आले होते. यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना वारंवार खलनायक म्हणतो. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाही ते तुरुंगात गेले आमच्यासारखे आणि जे झुकले व घाबरले ते भाजपात गेले”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
ते म्हणाले, “महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे. मी आरोप म्हणणार नाही तर खुलासा म्हणेल. कारण आरोप हवेत होत असतात. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थी पाठवला आणि त्या मध्यस्थीने अनिल देशमुख यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला तीन एफीडेव्हीट देतो, त्या एफीडेव्हीटवर तुम्ही सह्या करा. त्यानंतर तुमच्यावर जी ईडी आणि सीबीआयची जी कारवाई होत आहे, त्यामधून आम्ही तुम्हाला वाचवू. तुम्हाला अटक होणार नाही. अशाप्रकरचा इशारा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने झाला”, असा दावा राऊतांनी केला आहे.