Kharghar Jewellery Store Robbery : नवी मुंबईत तीन भुरट्यांनी दुकानात गोळीबार करून 11 लाखांचे दागिने लुटले
•Navi Mumbai Kharghar Jewellery Store Robbery नवी मुंबईत तोंडावर रुमाल बांधलेले चोरट्यांनी एका दुकानावर दरोडा टाकला आहे
नवी मुंबई :- खारघर परिसरातील एका दुकानावर तीन तोंडाला रुमाल घालून भुरट्यांनी गोळीबार करून 11 लाखांहून अधिक किंमतीचे दागिने लुटले. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. रविवारी रात्री 11 वाजता ही घटना घडल्याचे खारघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले, “काळ्या कपड्यातले तीन लोक रिव्हॉल्व्हर घेऊन दुकानात घुसले. कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्यावर हल्ला करून 11.80 लाख रुपयांचे दागिने लुटले. त्यांनी तीन मिनिटांत चार ते पाच वेळा गोळीबार केला. मात्र, या काळात कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिघेजण मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळून जाताना दिसत आहेत आणि काही लोक त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दरोडा आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.