Prakash Mehta : भाजपा माजी मंत्री प्रकाश मेहता विधानसभेसाठी इच्छुक, पदाधिकारी मेळाव्यातून प्रकाश मेहता घेणार निर्णय
BJP MLA Prakash Mehta : 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने प्रकाश मेहता यांचे तिकीट कापले होते
मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election राज्यात राजकीय नेते मंडळांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या पराभवानंतर भाजप आता विधानसभेपूर्वी कंबर कसताना दिसत आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने अनेक दिग्गज नेत्यांचे तिकीटाकून नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. परंतु दिग्गजांवर झालेल्या अन्याय यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जमणार का असा प्रश्नचिन्ह यावे उपस्थित झाला आहे. घाटकोपर आणि मुंबईच्या राजकारणात आणि गुजराती समाजात मोठे वर्चस्व असलेले प्रकाश मेहता Prakash Mehta यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता पुन्हा इच्छुक असल्याचे कार्यकर्ते मेळाव्यातून सांगण्यात आले आहे. BJP Maharashtra Latest News
2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश मेहता यांचे भाजप आणि तिकीट कापून त्यांच्या सहकारी पराग शहा Parag Shah यांना जबाबदारी दिली होती. पराग शहा यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला जरी असला तरीही स्थानिक भाजप त्यांच्यावर नाराज असल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चा होत्या. खुद्द प्रकाश मेहता पराग शहा यांच्यावर नाराज असल्याच्या अनेक वेळा चर्चा रंगल्या होत्या. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घाटकोपर पूर्व विधानसभेतून प्रकाश मेहता इच्छुक असल्याचे सध्या चर्चा आहे. गेले 40 वर्ष प्रकाश मेहता यांनी या मतदारसंघातून आपला झेंडा अबाधित राखला होता. तसेच, प्रकाश मेहता हे युती सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री, तसेच पालकमंत्री रायगड जिल्ह्याचे होते. यादरम्यान त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. प्रकाश मेहता ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या अनेक चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. परंतु त्यांनी कोणताही पक्ष न बदलण्याचा निर्णय त्यावेळी जाहीर केला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळणार का? ही प्रकाश मेहता आपली राजकीय भूमिका बदलणार हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे BJP Maharashtra Latest News