Bhiwandi Tadipar Criminal : शांतीनगर पोलिसांची कारवाई ; मनाई आदेशाचा भंग करणारा तडीपार गुंड गजाआड
Bhiwandi Tadipar Criminal : तडीपार आरोपीला दोन वर्षाच्या कालावधी करिता पाच जिल्ह्यातून हद्दपार केले होते, आरोपीला केले जेरबंद
भिवंडी :- तडीपारीची कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला शांतीनगर पोलिसांनी Shanti Nagar Police जेरबंद केलं आहे.आरोपी कादीर ऊर्फ बाबा इस्माईल शेख Baba Shaikh (40 वर्ष, रा. चव्हाण कॉलनी भिवंडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Bhiwandi Tadipar Criminal
“Urgent Action Needed: Fugitive Gangster Finally Apprehended in Bhiwandi”
कादीर ऊर्फ बाबा इस्माईल शेख याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला ठाणे, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या पाच जिल्हा हद्दीतून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर पोलीस उपआयुक्त,परिमंडळ -2 यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना शहरामध्ये वावर करत होता. त्याला 17 मे 2024 रोजी दोन वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2, भिवंडी यांची कोणतीही परवानगी न घेता शहरांमध्ये तो राहत असलेल्या नवी वस्ती येथे आला होता. भिवंडी गुन्हे शाखा घटक-2 पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी कादारी उर्फ बाबा याला चव्हाण कॉलनी कासीमनगर भिवंडी येथून अटक केली आहे. सरकारतर्फे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस नाईक धायगुडे हे करत आहे. Bhiwandi Tadipar Criminal