Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा होणार का?
Maharashtra Politics Latest Update : निति आयोगाची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत.
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निती आयोगाच्या बैठकीत ते सहभागी होतील. शिंदे आज रात्री आठ वाजता दिल्लीत पोहोचतील. यासोबतच देवेंद्र फडणवीसही Devendra Fadnavis दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. दिल्लीत भाजपच्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार असून, त्यात फडणवीसही सहभागी होणार आहेत. Maharashtra Politics Latest Update
शिंदे आणि फडणवीस यांच्यात स्वतंत्र राजकीय बैठक होण्याची शक्यता असून त्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुती नेत्यांनी आपापली तयारी सुरू केली आहे.
भाजप महाराष्ट्रात 150 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते एकत्र भेटून जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 152 जागा लढवल्या होत्या. Maharashtra Politics Latest Update
भाजपच्या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांचीही बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना खासदार-आमदारांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेऊन अधिकाधिक जागांवर निवडणूक लढवावी, अशी सूचना केली. मिळालेल्या बातमी नुसार, शिवसेना महायुतीकडे 125 जागांची मागणी करत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 80 जागांसाठी सर्वेक्षण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत 80 जागा लढवणार असून या जागा निवडण्यासाठी पक्षाने राज्यभर सर्वेक्षण सुरू केले आहे. Maharashtra Politics Latest Update