Mumbai Drug News : अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई ; कोट्यावधी किंमतीचा अंमली पदार्थ पोलिसांकडून करण्यात आला नष्ट
Mumbai Police Busted Drugs : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कारवाई 76 गुन्ह्यातील 538 किलो वजनाचा अंमली पदार्थ केला नष्ट
मुंबई :- अंमली पदार्थ, कच्चामाल, रसायने, सामग्री यांसारख्या पदार्थांपासून आणि साधनसामग्री पासून तयार झालेल्या अंमली पदार्थ Drugs मोठ्या प्रमाणावर विक्रीकरिता उपलब्ध असताना पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. तब्बल वीस कोटीहून अधिक रुपयाचा अंमली पदार्थ पोलिसांनी नष्ट केला आहे. एकूण 76 गुन्ह्यातील 538 किलो वजनाचा आणि 991 कोडीन मिश्रित बॉटल असा जप्त केलेला अंमली पदार्थ ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटी रुपये अशी आहे. Mumbai Police Latest Drug Busted News
तळोजा च्या एमआयडीसीमध्ये अंमली पदार्थाचा केला नाश
अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत जप्त केलेला अंमली पदार्थ 24 जुलै रोजी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असलेल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड प्लांट नं-पी अँड पार्ट, एमआयडीसी तळोजा, तालुका पनवेल येथे बंदिस्त भट्टीत पोलिसांनी जाळून नष्ट केला आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी पथकांच्या विरोधात कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. अंमली पदार्थ खरेदी-विक्री तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी Take Action Against Drug Dealer And Sale कारवाईचा बडगा उभारला आहे. Mumbai Police Latest Drug Busted News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांचे मान्यतेने तसेच घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीचे अध्यक्ष पोलीस सह आयुक्त (का.व सु.) सत्य नारायण, सदस्य अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (अं.प.वि.कक्ष) शाम घुगे तसेच रासायनिक तज्ञ, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना यांचे प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक भांडारगृह बाळासाहेब शिंदे, प्रभारी पोलीस निरीक्षक वरळी युनिट संदिप काळे, पोलीस हवालदार शेडगे,वाळके, महिला पोलीस हवालदार नाईक, पोलीस शिपाई जाधव यांनी सदर अंमली पदार्थाची नाश प्रक्रिया करण्यासंबंधीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. Mumbai Police Latest Drug Busted News