Navi Mumbai Crime News : फोरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊन असे खोटे आमिष, 22.50 लाखाची फसवणूक
•The Dark Side of Forex Trading : Lies and Deception Exposed दुबईतून गुंतवणुकीचे खोटे आमिष देणा-या टोळीतील एका आरोपीस “सायबर सेल” पनवेल यांनी केले जेरबंद
नवी मुंबई :- दुबई येथून कॉल सेंटर व व्हाट्सअप करून ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. या आमिषाला फिर्यादी बळी पडत डेबिट, क्रेडिट कार्ड मधून टप्प्याटप्प्याने 18 लाख 54 हजार 295 वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. Cyber Cell Catches Mastermind of Dubai-based Trading Scam तसेच,चार लाख रुपये रोख रक्कम देऊन एकूण 22 लाख 54 हजार 255 रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी आणि खंडेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. फिर्यादी याच्या तक्रारीवर भादवी कलम 420, 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 66 (सी) ,(डी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर सेल पनवेल चे पोलीस निरीक्षक दिपाली पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्यातील बँक व्यवहाराच्या विश्लेषण आणि तांत्रिक विश्लेषण आधारे या टोळीतील संशयित आरोपी हा मुंबईच्या ॲन्टॉपहिल परिसरात राहत असल्याची खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती.
सायबर फ्रॉड आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यला अटक
सायबर सेल पनवेल पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने मुंबईच्या ॲन्टॉप हिल येथून अटक करण्यात आली आहे. Beware of False Promises : Mumbai Police Busts International Cyber Fraud Ring आरोपीकडून गुन्ह्यातील कंपनी वेबसाईट व इतर आरोपी बाबत अधिक माहिती व टोळीतील इतर साथीदारांचा पुरावे मिळावी यासाठी पोलिसांकडून आरोपीकडची सखोल चौकशी केली जात आहे. फिर्यादीच्या फसवणुकीत झालेले एकूण रकमेपैकी नऊ लाख 75 हजार 455 परत मिळून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Trendy and Current : Dubai Call Centers and WhatsApp Trading – The Latest Scam Exposed by Mumbai Police
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2पनवेल विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली EMC सायबर सेलचे पोलीस निरीक्षक दिपाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस उपनिरीक्षक किरण राउत, पोलीस हवालदार वैभव शिंदे, प्रगती म्हात्रे, पोलीस हवालदार संतोष चौधरी या पथकाने उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा पुढील तपास EMC सायबर सेल, पनवेल पोलीस निरिक्षक दिपाली पाटील करीत आहेत.