Mumbai Weather Update : मुंबईत पावसाची संततधार तर राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस
Mumbai Weather Update News : मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ! तसेच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला
मुंबई :- मंगळवारी मध्यरात्रीपासूनच मुंबई सह राज्याच्या विविध भागात पावसाने जोर धरला आहे. मागील काही दिवसातच मुंबई सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे तर बुधवार 24 जुलै रोजी पुढील काही तासात मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता तर काही भागात मुसळधार पाऊस होण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मोठ्या प्रमाणावर काळे डाग आले असून अंधारल्यासारखं वातावरण सध्या सर्व शहरांमध्ये दिसून येत आहे. Mumbai Weather Update News
आज (24 जुलै) सकाळपासून उपनगरातील अंधेरी, पवई, वांद्रे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे. मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मुसळधार पावसाची होण्याची शक्यता आहे. रायगड आणि साताऱ्यात अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Mumbai Weather Update News