Lions Club Of Panvel Sargam : गुरुपौर्णिमा निमित्त लायन्स क्लब पनवेल सरगम यांच्याकडून गुरुजनांचा सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न
Lions Club Of Panvel Celebrated Guru Purnima in Sargam गुरुजनांसाठी लायन्स क्लब पनवेल सरगम यांच्याकडून आगळावेगळा उपक्रम
पनवेल :- लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्त माजी प्रांतपाल तसेच गुरुजनांचा सन्मान सोहळा गोखले सभागृह पनवेल येथे संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रांतपाल एन आर परमेश्वरन तर विशेष अतिथी म्हणुन मल्टिपल कौन्सिल चेअरमन ए के शर्मा उपस्थित होते. या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 मधील सर्व माजी प्रांतपाल तसेच बांठीया हायस्कूल, नवीन पनवेलचे मुख्याध्यापक भगवान माळी आणि फडके हायस्कूल, शिरढोणचे युवराज सुर्यवंशी याना सन्मानित करण्यात आले.
लायन्स क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला. विशेष अतिथी अमरचंद शर्मा यांनी आपल्या मनोगतात सरगम क्लब करत असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि क्लबमध्ये नवीन सभासद वाढवावेत असे आवाहन केले. त्यांनी गतवर्षी केलेल्या उत्तम कार्याबद्दल गतवर्षीच्या अध्यक्ष स्वाती गोडसे, सचिव संविदा पाटकर, खजिनदार अलकेश शहा तसेच मानदा पंडित यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. प्रमुख पाहुणे प्रांतपाल एन आर परमेश्वरन यांनी आपल्या जीवनातील गुरूचे महत्व उदाहरण देऊन सांगितले आणि भविष्यात सरगम क्लब असेच उत्तम समाजोपयोगी उपक्रम आयोजित करेल असा विश्वास व्यक्त केला.
सत्कारमूर्तीचे वतीने माजी प्रांतपाल मुकेश तनेजा, माळी सर आणि सुर्यवंशी सर यांनी आपले मनोगत सांगितले आणि सरगम क्लबचे या सत्काराबद्दल आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, झोन चेअरमन अलकेश शहा उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोडसे तर आभार प्रदर्शन सचिव प्रेमेंद्र बहिरा यांनी केले.
यावेळी सरगम क्लबचे सभासद संविदा पाटकर, संजय गोडसे, मधुरा राजीव, प्रकाश भारद्वाज, सुरभी पेंडसे यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले, तसेच सत्कारमूर्ती मुकेश तनेजा आणि युवराज सुर्यवंशी यांनी सुद्धा आपली गीते सादर केली.या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट पदाधिकारी सत्यपाल चुघ, मिलिंद पाटील, रमाकांत म्हात्रे, विजय गणात्रा, सरगम क्लबचे स्वाती गोडसे, धवल शहा, आदित्य दोशी, संध्या महानुभाव आदि मान्यवर उपस्थित होते.