मुंबई

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरणमहानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या संकल्पनेतील उपक्रम.

पनवेल : पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण (Prathamesh Chandrashekhar Soman) यांनी शिव चित्रपट सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सव 2024’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलचे पोस्टर (Film Festival ) अनावरण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पार पडले. याद्वारे महाराष्ट्रातील विविध होतकरू कलाकारांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे कलाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या राजकीय जीवनावर किंवा त्यांनी जनसामान्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना कसा मिळाला यावर लघुपट म्हणजेच शॉर्ट फिल्म बनविणार आहेत. याचा दिमाखदार प्रीमियर पनवेलमध्ये सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार असून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येतील असे या उपक्रमाचे आयोजक प्रथमेश सोमण यांनी सांगितले. यावेळेस प्रथमेश सोमण यांच्यासह आमदार प्रकाश सुर्वे, प्रवक्त्या शितल म्हात्रे, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, शैलेश जगनाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ कलाकार व दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव हे या उपक्रमाचे पुढील नियोजन करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमण यांच्या या कल्पक उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0