Mumbai Police Break Kidnapping Case : मुंबई पोलिसांची कामगिरी ; मारहाण, अपहरण, 12 तासात सुटका, तीन आरोपींना अटक
मुंबई :- पैशाच्या वादातून मारहाण करून अपहरण केले असल्याचे तक्रारीचा कॉल मुख्य नियंत्रण (Mumbai Police Call Center) कक्षाकडून प्राप्त झाला होता. 21 जुलै दुपारी दोन वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान मुंबईच्या चिरा बाजार परिसरातून एका व्यक्तीला चार जणांनी मारहाण केली आहे. तसेच, त्याचे अपहरण करून त्याला गाडीतून कुठेतरी घेऊन गेले असा कॉल अपहरण झालेल्या व्यक्तीचा मित्र कार्तिक सिंग राठोड यांनी केला होता. मित्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कार्तिक सिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे (Lokmanya Tilak Marg Police Station) कलम 140 (3),115(2),61 (2),189(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mumbai Police Latest Update
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना
परिमंडळातील अधिकाऱ्यांचे पथक तयार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घाडीगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे, तसेच डी.बी मार्क पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि पायधुनी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वायाळ असे पथक तयार करून पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्याकरिता तसेच मुख्य आरोपीचा शोध घेण्याकरिता रवाना झाले. Mumbai Police Latest Update
बारा तासाच्या आत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका
तांत्रिक तपासावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी आरोपींनी वापरलेल्या वाहनांच्या नंबरावरून पोलिसांनी गाडीचा मागवा घेतला असता कोंढवा, पुणे येथील पत्त्यावर असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून अतिशय कौशल्याने तपास करून बारा तासाच्या आत गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच अपहरण झालेल्या व्यक्ती हेमंतकुमार रावल (30 वर्ष) यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचे तपास करिता वेगवेगळे पोलीस पथक तयार करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे मुंबई यांनी पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी अंमलदार यांच्या मदतीने अपहरण झालेल्या व्यक्तीचे सुटका करण्यात आली असून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. Mumbai Police Latest Update
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, मुंबई, डॉ. मोहितकुमार गर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठपुरावा केल्याने उघडकीस आलेला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई ज्ञानेश्वर वाघ यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वायाळ, पोलीस हवालदार परूलेकर, मुन्ना सिंग, सानप, तळेकर, पोलीस शिपाई वाकचौरे, वाकसे, जोशी, शिंदे, भामरे यांनी उघडकीस आणलेला आहे.