Vasant More Threat Call : शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांना धमकीचा फोन

Vasant More Threat Call : ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल, मनसेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले, भाच्याला कॉल करून वसंत मोरेला मारणार असल्याचे धमकी
पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जय महाराष्ट्र केल्यानंतर आता पुण्याचे डॅशिंग आणि आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे हे ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षामध्ये आहे. वसंत मोरे Vasant More यांना आणि त्यांच्या भाच्याला धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. Vasant More Threat Call अज्ञात व्यक्तीकडून त्यांना फोन करून मनसेचा कार्यकर्ता बोलत असल्याचे सांग म्हणून त्यांच्या भाच्याला वसंत मोरेचा गेम करणार असल्याचे सांगितले आहे. अशी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेनंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात Bharti Vidyapeth Police Station तक्रार दाखल केली आहे.
वसंत मोरे यांनी आपल्या तक्रारीत काय म्हटलं?
वसंत मोरे यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “मागील 15 दिवसापूर्वी मी माझ्या नित्यक्रमाने दिवसभर माझ्या कामात व्यस्त होतो. मला माझ्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीने फोन करून शिव्या द्यायला सुरुवात केली. मी त्याला कारण विचारले असता त्याने काहीही न सांगता शिव्या देणे सुरु ठेवले. मग मी दुर्लक्ष करून त्याचा फोन कट केला. तो परत फोन करून शिव्या देऊ लागला.”त्यांनी तक्रारीत म्हंटल आहे की, “मी माझ्या कामात व्यस्त असल्याने मी त्याचा नंबर ब्लॉक केला. मग त्याने दुसऱ्यानंबरवरून कॉल करायला सुरुवात केली. मग मी माझा भाचा प्रतीक कोडीतकर याला फोन करून सांगितले की, मी कामात आहे, कोणीतरी या नंबरवरून फोन करून मला शिव्या देत आहे. तू याला फोन करून माहिती घे की, त्याचा काय प्रॉब्लेम आहे. मग प्रतीकने त्याला फोन केल्यावर त्याने प्रतीकलाही शिवीगाळ करायला सुरुवात केली.”
तक्रारीत लिहिलं आहे की, अज्ञात व्यक्ती म्हणलं की, “येत्या एक तारखेच्या आधी मी वसंत मोरेचा खून करणार असे बोलून संबंधित व्यक्ती शिव्या देऊ लागला. राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना अशा गोष्टी घडत असतात असा विचार करून मी त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु सद्यस्थितीत सुरु असलेल्या घटना लक्षात घेता ही, गोष्ट गांभीर्याने घेणे मला महत्त्वाचे वाटले म्हणून आपणास मी या पत्राद्वारे विनंती करत आहे की, मला फोन करून धमकी देणाऱ्या सदर व्यक्तीचा शोध आपण घ्यावा. Vasant More Latest Update
मोरे तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, “या सर्व प्रकरणामागे व मला जीवेमारण्याची धमकी द्यायला लावण्यामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा मला दाट संशय आहे. तरी मी आपणास विनंती करतो की, मला फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला व मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी, अन्यथा रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.” Vasant More Latest Update