Mumbai Crime News : पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या लेकींनी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी राज्यभरात दिले पोलिसांना निवेदन….
नवी मुंबई, महाराष्ट्र मिरर : नवी मुबईतील बेलापूर Navi Mumbai Belapur येथील विवाहिता अक्षता म्हात्रे Akshata Mahtre या 30 वर्षीय महिलेचे पती आणि सासू सोबत भांडण झाले म्हणून ती घरातून निघून कल्याण जवळील शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरामध्ये गेली. Mumbai Rape Case Incident त्यावेळी रात्री मंदिरात एकटी असलेल्या अक्षताला मंदिरातील तिघा सेवेकऱ्यांनी भांगेच्या गोळ्या Bhang Goli असलेला चहा पिण्यासाठी दिला होता. Mumbai Latest Crime News
ज्यामुळे नशेमध्ये असलेल्या अक्षतावर तीनही आरोपींनी मंदिरातच आळीपाळीने जबरी बलात्कार केला. Mumbai Forced Rape Case काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या अक्षताने आरडाओरड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी अक्षताला मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अतिशय संताप जनक व राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या तसेच महिलांची सुरक्षा ऐरणीवर टांगणारा हा प्रकार असून त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. Mumbai Latest Crime News
अशा नराधम नीच प्रवृत्तीच्या मानसिकतेला लगाम बसावा तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्ष डॉक्टर स्मिता पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तर प्रदेश कार्याध्यक्ष सौ. श्रुती उरणकर, नवी मुंबई अध्यक्ष सौ सुजाता कडू , कार्याध्यक्ष सौ वर्षा लोकरे, प्रदेश संघटक सौ. निता माळी , उपाध्यक्ष सौ आरती पाटील, कोकण अध्यक्ष सौ ज्योतीका हरयान , पुणे अध्यक्ष सौ. ज्योती गायकवाड, सदस्य सौ रश्मी रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ दीपा ताटे , अकोला अध्यक्ष सौ सुनीता इंगळे , तुर्भे अध्यक्ष सौ वंदना अंबवले यांनी आपापल्या सहकारी सदस्यांसह राज्यभर पोलिसांना निवेदन दिले. Mumbai Latest Crime News
महिला उत्कर्ष समितीने दिलेल्या या निवेदनात पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी केली की जरी गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली असली तरी हा खटला जलदगती कोर्टात चालवून दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना फासावर लटकवण्यात यावे ज्यामुळे समाजात अशा घटना करण्यास कोणी धजावणार नाही तसेच कायद्याची जरब राहील.
महिला उत्कर्ष समितीच्या या निवेदनाची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून तपास अधिक जलद गतीने करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. Mumbai Latest Crime News