Pune Police News : महाराष्ट्र मिरर बातमीचा इम्पॅक्ट, अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police All Out Operation News : खडक पोलिसांचे मोठी कारवाई ; ऑपरेशन ऑल आउट व ऑपरेशन वॉश आऊट अंतर्गत कारवाई करत अवैधरित्या जुगार, मटका, गुटका, दारूचे धंदे केले उद्ध्वस्त
पुणे :- महाराष्ट्र मिरर केलेल्या Maharashtra Mirror बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला असून शहरातील बेकायदेशीर आणि अवैध रित्या धंदा करणाऱ्या विरुद्ध खडक पोलिसांनी Khadak Police कारवाईचा बडगा उभारला आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस यांनी राबवलेल्या ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन वॉश Pune Police All Out Operation आऊट खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. Pune Police Latest News
दहा लाख रुपयाचा गुटखा खडक पोलिसांनी केला जप्त
13 जुलैपासून लोहिया नगर परिसर आणि काशेवाडी परिसरात येथील भागात मटका, जुगार, अवैध गुटखा,दारूचे धंदे याबाबत माहिती घेऊन सुचित केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे विराणी स्टीलची गल्लीमध्ये सोनारमार्क थेटर च्या समोर लोहिया नगर पुणे या ठिकाणी दोन टेम्पो येणार आहे ज्या टेम्पोमध्ये राज्यांमध्ये प्रतिबंध असलेला गुटखा सुगंधी तंबाखू या मालाची टेम्पोमध्ये विक्री करत असल्याबाबतची खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस आणि त्यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार आणि हवालदार दुडम, पोलीस शिपाई वाबळे,ढावरे यांच्या पथक रवाना झाले होते. पोलिसांनी छापा टाकला असता दोन टेम्पो पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामधील एका टेम्पोमध्ये चार लाख पाचशे रुपयांचा तर दुसऱ्या टेम्पो मध्ये सहा लाख 19 हजार 700 रुपयांचा विमल पान मसाला, प्रेमियम राजनिवास सुगंधी पान मसाला, झेड एल 01 जाफराने जरा तंबाखू असा प्रतिबंधक गुटका पांडमसाला असे एकूण दहा लाख 21 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने खडक पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कल 123,223,274,27,3(5) व अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 30 (2) (अ), 31(1), 26(2) (1) 26 (2) (IV) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन ॲन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन 2011 चे नियमन 2,3,4 चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Pune Police Latest News
आरोपीला अटक तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
आकिब शकील शेख, (32 वर्ष) (रा.54 ए.पी. लोहीयानगर, पुणे) यांचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपी यांनी गुटखा कोठून आणला, कोणाकडून आणला, कोणत्या वाहनातून आणला, कोणाला विक्री केला, व पोलीस ठाणे हद्दीमध्ये अजून कोणाकडे अवैध गुटखा सुरू आहे याबाबतची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. सदर आरोपी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 03 दिवस पोलीस कोठडी ठोठावली होती. सध्या आरोपी याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. सध्या इतर आणि मुख्य आरोपीचा शोध घेवून गुटख्याची पुढील चेन उध्दवस्त करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत. Pune Police Latest News
पोलीस पथक
संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 पुणे व सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे ,पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष खेतमाळस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, लखन डावरे, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले आशिष चव्हाण, इरफान नदाफ, भालचंद्र दिवटे, दिनेश अवघडे यांचे पथकाने केली आहे. Pune Police Latest News