क्राईम न्यूजपुणे

Pune Gutkha Mafia | पुण्यात गुटखा खुलेआम ! : ५५ सुपर स्टॉकिस्टची यादीच सोशल मीडियावर झळकली

  • Pune Gutkha Mafia
  • पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून अवैध धंदे बंद असताना ‘गुटखा’ सुरूच कसा?
  • पुण्यासह राज्य पोलीस प्रशासनात चर्चांना उधाण

पुणे, दि. १८ जुलै, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Gutkha Mafia

पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी अवैध धंद्यांना ‘फुल स्टॉप’ लावल्यानंतरही पुण्यात गुटखा खुलेआम विक्री होत असल्याने गुटख्याला कोणाचे अभय लाभले आहे? याबाबत Pune Police पुण्यासह राज्य पोलीस प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे. गुटख्याबाबत सोशल मीडियावर ५५ सुपर स्टॉकिस्टची यादीच झळकल्याने खळबळ उडाली आहे. Pune Gutkha Mafia

क्राईम रिपोर्टर अर्चना मोरे यांनी ‘Scoope’ या इन्स्टा पोर्टलवर याबाबत विशेष बातमी प्रसिद्ध केली होती.

पुणे शहर अंतर्गत अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक उपाय योजना राबविल्या. यात महत्वाचे म्हणजे हद्दीतील वसुली बहाद्दरांची यादी तयार करून त्यांना अल्टिमेटम देण्यात आला. यातील बोर्डावरील 44 जणांना प्रशिक्षण देखील देण्यात आले. असे असताना देखील गुटखा खुलेआम विक्री होत आहे. यापाठीमागे कोण आहे याबाबत चर्चाना उधाण आले आहे.

शहरात खुलेआम सुरु असलेल्या गुटख्याचा मलिदा कोण लाटत आहे ? याबाबत पुणेकरांमध्ये चर्चा रंगली आहे. एकीकडे कारवाईचा फार्स निर्माण करून दुसरीकडे मलिद्याचा वाटा लाटायचा असाच पायंडा दिसून येत आहे. अन्न आणि औषध विभागाकडून देखील गुटख्याच्या कारवाया होत नसल्याने प्रशासनातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

निजाम, प्रकाश भाटी, सुजित, बालाजी, गणपत सेठ, तानाजी देशमुख, प्रशांत भंडारी, सुमित, शाम राठोड, अंकुर गुप्ता, रांका, उबाळे, संदीप, अरिफ, खान, सागर लुमिया व इतर असे एकूण ५५ जणांची यादीच सोशल मीडियावर झडकली आहे.

परमिशन कोणाची? वसुली करतोय कोण ?

क्रमश :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0