ठाणे
Photography Contest : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ठाणे महापालिका चषक 2024
Photography Contest छायाचित्र स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सर्व्हिस रोड, तीन हात नाका येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेस जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरुन प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन 17 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत भरविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. गेल्यावर्षी जवळपास 4600 छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदविला असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे तीन स्तर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी 'Performing Art', 'Festival', 'Wild Life' राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी 'Wedding', 'News Photo', 'Photo Features (story)' तर जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी 'Thane 24' 'Monsoon'हे विषय ठेवण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयीन तरुणतरुणींसाठी 'Reflection' हा विषय ठेवण्यात आला आहे. तर यावर्षी महापालिका अधिकारी कर्मचारी व खास ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी 'Daily Life' हा विषय ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण रु.6,75,000/- रुपयांच्या रोख पारितोषिकासह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तीन विषय असून तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 50,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.25,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- ठेवण्यात आले आहे.
राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी तीन विषय असून तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 25,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.20,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- ठेवण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी दोन विषय असून दोन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु. 20,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- तर चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु. 3,000/- ठेवण्यात आले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु.20,000/- द्वितीय क्रमांसाठी प्रत्येकी रु. 15,000/-तृतीय क्रमाकांसाठी रु. 10,000/- तर चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- ठेवण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ही विनामूल्य असून स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारी छायाचित्रे 11 जुलै 2024 ते 05 ऑगस्ट 2024 या कालावधीत www.tsdps.in पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी श्री. दिपक जोशी 9821719988, श्री. प्रफुल्ल गांगुर्डे 9819871155 व श्री. मनोज सिंग 7506550303 यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी होवून ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.