Vasai Tadipar News : तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात सराईत गुन्हेगाराला केले तडीपार, एका महिला गुन्हेगाराचा ही समावेश
•तुळींज पोलीस ठाण्याचे कामगिरी ; मी ते जुलै दरम्यान सात सराईत गुन्हेगारांना केले तडीपार, एका महिला आरोपीचा समावेश, पाच आरोपींना दोन वर्षाकरिता तर दोन आरोपींना एक वर्षाकरिता केले तडीपार
वसई :- तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात सराईत आरोपींना मे ते जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत हद्दपार करण्यात आले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेताच पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना हद्दपार करण्याचे म्हणजेच तडीपार करण्याचे निर्णय वरिष्ठांनी दिले आहे. कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्याकरिता पोलिसांकडून उपाय म्हणून तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे निर्देश वरिष्ठांकडून दिले आहे. सात तडीपार आरोपींपैकी पाच आरोपींना दोन वर्षाच्या कालावधी करिता तर दोन आरोपींना एक वर्षाच्या कालावधी करिता तडीपार करण्यात आले आहे. या सात आरोपी मध्ये एक महिला आरोपीचाही समावेश आहे.
आरोपींचे नावे आणि आरोपींना किती वर्षासाठी केली तडीपार
1.आमीर शरीफ अन्सारी उर्फ पठाण वय 23 वर्ष,(रा. रूम नंबर ०३ शियपावर्ती अर्पा, सुप्लाझा बिल्डींगच्या समोर प्रगतीनगर नालासोपारा पूर्व,)
पोलीस उप आयुक्त परि-2 वसई, यांचे कार्यालय मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश 17 मे 2024 पासून 2 वर्षाकरीता
2.नरेंद्र पुरणसिंह शर्मा, (25 वर्ष) रा. रुम नं.०९, एकदंत अर्पा-विनायक नगर मोरेगांव ना.सो.पूर्व.
पोलीस उप आयुक्त परि-2 वसई, यांचे कार्यालय मिरा-भाईंदर, चसई विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश दिनांक 17 मे 2024 पासून 2 वर्षाकरीता
3.महिला आरोपी गायत्री अच्छेलाल तिवारी, रा. रूम नं. २०३, साईचंद्र विला, ओमनगर, सितारा बेकरीच्या मागे, नालासोपारा पूर्व वसई जि.पालघर
पोलीस उप आयुक्त परि-२ वसई, यांचे कार्यालय मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश दिनांक 15 मे 2024 पासून 2 वर्षाकरीता.
4.रिज्ञावान इमामुद्दीन खान (29 वर्ष) रा. रुम नं. ४०१, शमा अपार्टमेंट, अंन्सारनगर मस्जिद, लक्ष्मीनगर, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर
पोलीस उप आयुक्त परि-२ वसई, यांचे कार्यालय मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश दिनांक 31 मे 2024 पासून 2 वर्षाकरीता.
5.इंइस्लाम अली शेख (44 वर्ष), व्यवसाय दुकान रा. सम नंबर १०३ श्री साई अर्पा, शुक्ला नगर सिताराम नगर संतोषभुवन नालासोपारा पूर्व, ता. वसई जि. पालघर.
पोलीस उप आयुक्त परि-2 वसई, यांचे कार्यालय मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश दिनांक , 12 जुलै 2024 पासून 1 वर्षाकरीता
6.राजेश कुमार रामकेवल पांडे (46 वर्ष), रा. २०२ शुक्ला कंपाऊड गौरीदर्शन अर्पा, सिताराम नगर, संतोषभुवन नालासोपारा पूर्व
पोलीस उप आयुक्त परि-2 वसई, यांचे कार्यालय मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश दिनांक 12 जुलै 2024 पासून 1 वर्षाकरीता.
7.समरजित शिवनाथ विश्वकर्मा (56 वर्ष), रा. रूम नं.१३, जय सिताराम वेल्फेअर सोसायटी नुरी मस्जिद जवळ संतोषभवन, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर.
पोलीस उप आयुक्त परि-2 वसई, यांचे कार्यालय मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश दिनांक 16 जुलै 2024 पासून 1 वर्षाकरीता.
पोलीस पथक
मधुकर पांडे, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पौणिमा चौघुले श्रींगी,पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, वसई, उमेश माने-पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेंद्र नगरकर याचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, दत्तात्रय पाटील, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पाटील परि.-2 वसई, पोलीस हवालदार अनिल शिदे, अशोक तांडेल, पोलीस अंमलदार आकाश वाघ यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.