Yerwada Bhajan Programme : येरवडा कारागृहातही विठ्ठलाचा गजर..
Yerwada Bhajan Programme : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैदी ही विठ्ठलाच्या भजनामध्ये तल्लीन, येरवडा कारागृह विठ्ठलाच्या गजराने दुमदुमला
पुणे :- येरवडा मध्यवर्ती Yerwada Prison कारागृहाच्या बंदिस्त कैद्यांकरिता विशेष पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर, यांच्या संकल्पनेतून उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा मध्यवर्ती कारागृहात कीर्तन व भजन सोहळा आयोजित केला होता.Yerwada Bhajan Programme या कार्यक्रमात येरवडा कारागृहातील कैदी विठ्ठलाच्या गजराने तल्लीन झाले संपूर्ण येरवडा कारागृह विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमले. Yerwada Jail News
माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ” जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो” या पसायदानाच्या आकांक्षाचे प्रत्यक्ष प्रकटीकरण करणारा किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला.
कारागृहातील चार भिंतींच्या आत बंदीस्त बंदीजनांच्या मनावर किर्तनाच्या अभिसिंचनाने मन परीवर्तन घडवुन ” नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी” या जाणिवेतून त्यांच्या अंतरीच्या ज्ञानदीप प्रज्वलित होईल. भक्तीच्या शक्तीची महती संक्रमित करण्यास हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल. असा उपक्रम डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व स्वाती साठे. कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचं मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, पोलीस कदम उपअधीक्षक, आर ई गायकवाड उपअधीक्षक, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी. व्ही. के. खराडे, सुभेदार यांनी कामकाज पाहीले. आणि हा भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाला आहे. प्रशासनाने राबवलेल्या या उपक्रमात नक्कीच कैद्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम करून त्यांचे मन परिवर्तन करण्यास मदत होईल असे हेतू समोर ठेवून हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. Yerwada Jail News