Mumbai Local Train Update : रविवार, 14 जुलै 2024 रोजी मेगा ब्लॉक: मध्य आणि हार्बर मार्गांवर मुंबई लोकल ट्रेन सेवेवर परिणाम
Mumbai Local Train Update : हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 5 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.
मुंबई :- रेल्वेने मध्य Central Railway आणि हार्बर मार्गावर Harbor Railway मेगाब्लॉक जाहीर केल्यामुळे रविवार, 14 जुलै रोजी मुंबईतील लोकल ट्रेन Mega Block On 14 July सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरांची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.घोषणेनुसार, ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान (5वी आणि 6वी लाईन) सेंट्रल लाईनवर सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्याचप्रमाणे हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 5 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. ट्रान्सहार्बर, अर्बा आणि वेस्टर्न लाईनसाठी कोणताही ब्लॉक जाहीर करण्यात आलेला नाही. Mumbai Local Train Update
कोणत्या ट्रेन्स रद्द? कोणत्या विलंबाने?
परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन मेल-एक्स्प्रेस जलद मार्गावरून धावतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. १९ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांसह काही लोकल फेऱ्या ही विलंबाने धावणार आहेत. वसई रोड-दिवा- वसई रोड मेमू कोपरपर्यंतच धावणार असल्याने कोपर ते दिवा दरम्यान मेमू फेऱ्या रद्द राहतील. रत्नागिरी -दिवा पॅसेंजर पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.
हार्बर रेल्वे
कुर्ला ते वाशी मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 कोणत्या ट्रेन्स रद्द? कोणत्या विलंबाने?
परिणाम – सीएसएमटी ते पनवेल बेलापूर वाशीदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळ लोकल सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे
मुंबई सेंट्रल ते माहीम
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 कोणत्या ट्रेन्स रद्द? कोणत्या विलंबाने?परिणाम – ब्लॉकवेळेत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेणार असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही .