Vidhan Parishad Election : 12 पैकी 11 उमेदवार विजय, उद्धव ठाकरे यांचा हुकमी एक्का विधान परिषदेवर
Vidhan Parishad Election Result 2024: पंकजा मुंडे यांचा विजय, महायुतीचे सर्व उमेदवार विजयी
मुंबई :- विधान परिषदेच्या Vidhan Parishad Election 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) रोजी मतदान झाले. आणि त्याच दिवशी निकालही लागला. यामध्ये उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे अत्यंत जवळचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणारे उद्धव ठाकरे यांच्या सावली बरोबर उभे राहणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हुकमी एक्का म्हणून ओळख असणारे मिलिंद नार्वेकर Milind Narvekar विधानपरिषदेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. Vidhan Parishad Election
तर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाले असून यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे ह्या विजयी झाले आहे. महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी झाले असून एकूण 12 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे विजयी झाले आहे. शेकापाचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटारे पाठिंबा जाहीर केला होता त्यांचा पराभव झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे दोन आमदार फुटल्याचे राजकीय चर्चा रंगली आहे. तर महायुतीचे एकूण नऊ उमेदवार रिंगणात उभे होते आणि हे नऊ उमेदवार विजयी झाले आहे. तसेच महाविकास आघाडीचे तीन पैकी दोन उमेदवार हे विजयी झाले आहे. Vidhan Parishad Election
विधान परिषद निवडणुक 2024
- महायुतीचे उमेदवार 9 उमेदवार विजयी..!
- महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी..!!
- भाजपा – 5
- पंकजा मुंडे – २६ (विजयी)
- परिणय फुके – २६ (विजयी)
- योगेश टिळेकर – २६ (विजयी)
- अमित गोरखे – २६ (विजयी)
- सदाभाऊ खोत – 23 (दुसरया पसंती क्रमांकाने विजयी..)
- शिवसेना – 2 उमेदवार विजयी
- भावना गवळी – २४ (विजयी)
- कृपाल तुमाने – २५ (विजयी)
- राष्ट्रवादी अजित पवार गट -2 उमेदवार विजयी
- राजेश विटेकर – २३ (विजयी)
- शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)
- महाविकास आघाडीचे उमेदवार
- काँग्रेस – 1 उमेदवार विजयी
- प्रज्ञा सातव – २५ (विजयी)
- शिवसेना उद्धव ठाकरे गट – 1 उमेदवार विजयी
- मिलिंद नार्वेकर – २२ (दुसरया पसंती क्रमांकाने विजयी..)
- राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थित
- जयंत पाटील(शेकाप) – १२ पराभूत..!!