मुंबई

Madhavrao Kinhalkar : भाजपला मोठा धक्का, माजी गृहमंत्र्यांचा सर्व पदांचा राजीनामा

•भाजपचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत पाटील यांनी पक्षाचा निरोप घेतला. आता आणखी एका मोठ्या नेत्याने भाजपचा राजीनामा दिला आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी गृहराज्यमंत्री डॉ.माधव किन्हाळकर यांनी भाजपचा निरोप घेतला आहे. किन्हाळकर यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात भाजपला जोरदार झटका बसला आहे. भाजप सोडल्यानंतर सूर्यकांत पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता माजी गृह राज्यमंत्री डॉ.माधव किन्हाळकर यांनी आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. भोकर मतदारसंघाची जबाबदारी माधव किन्हाळकर यांच्याकडे होती. अशा स्थितीत भाजपसाठी सूर्यकांत पाटील यांच्यानंतर हा दुसरा धक्का मानला जात आहे.

डॉ. माधव किन्हाळकर यांनी भोकर (विधानसभा मतदारसंघ) येथून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून २०१४ ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी 53,224 मते मिळवून त्यांचा पराभव झाला होता. 1991 ते 1999 या काळात त्यांनी भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. 1991 ते 1995 या काळात त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये गृह, महसूल आणि सहकार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0