Mumbai Crime News : टिळकनगर पोलिसांची कारवाई ; डिलिशिएस हॉटेलवर जप्तीची कारवाई
•डिलिशिएस हॉटेलच्या मालकी हक्काच्या कारणावरून पोलिसांची हॉटेल जप्तीची कारवाई
मुंबई :- अनधिकृत हॉटेल, पॅब, हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. राज्यात बेकायदेशीर हॉटेलविरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे अशातच टिळक नगर पोलिसांनी एका हॉटेलवर मालकी हक्कावरून जप्तीची कारवाई केली आहे. टिळक नगर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या डिलिशिएस हॉटेलच्या व्यवसायिक व त्यांची मालकी यांच्यात हॉटेलच्या मालकी हक्कावरून गेल्या कित्येक दिवसांपासून वाद चालू आहे.
हॉटेलवर कारवाई, दोघांना शहरातून केले तडीपार
टिळकनगर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये हाॅटेल डिलिशिएस व्यवसाय व त्याचे मालकी हक्का संदर्भात प्रियंका ललीतसिंग ठाकूर, इनायत रसुल खान व सोनी सचिन सिंग, राजेंद्र प्रेमचंद गुप्ता, दिपक जैस्वार यांचेमध्ये वाद असून त्यांचेवर टिळकनगर पोलीस ठाणे येथे विविध कलमान्यये गुन्हे दाखल आहेत. यातील सोनी सचिन सिंग व दिपक जैस्वार यांचेवर खुनाच्या प्रयत्नाचा देखील गुन्हा दाखल आहे. वास्तव त्यांचेवर मुंबई, मुंबई उपनगर सह ठाणे जिल्हयातून हद्दपार कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी न्यायालयात दावे सुरू असताना वर नमुद व्यक्तींवर दखलपात्र गुन्हे केल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 164,165 अन्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे.