पुणे

Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखीचे दौंड तालुक्यात जंगी स्वागत

[ यवत करांनी जपली ६० वर्षांची पिठलं भाकरीची परंपरा ]

यवत, ता. ४ संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala सोहळ्याचे बुधवारी ४ वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात लाखो वारकरी भाविकांचा हा सोहळा निर्मल वारी, हरित वारी हा संकल्प घेऊन निघालेल्या या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीने Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala दौंड तालुक्यात स्वागतासाठी पालखी मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. तालुक्यात प्रवेश करताच पालखीचे स्वागत करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताने वारकरी भारावून गेले. या पालखीत सहभागी असलेले अश्व सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. खांद्यावर भगवी पताका घेऊन हरी नामाचा जागर करीत वारकऱ्यांसह डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत. दौंड तालुक्यात पालखी सोहळ्याचे आगमन होताच वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी भोजन, चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यवत येथे पालखीचा मुक्काम असल्याने यवत ग्रामपंचायत व प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून यवत गावात योग्य नियोजन केले आहे. यासाठी आमदार राहुल कुल यांनी वेळोवेळी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या होत्या. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सार्वजनिक बांधकाम विभाचे हरीश्चंद्र माळशिकारे, आरोग्य अधिकारी उज्वला जाधव,
यवतचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत कर्मचारी हे गेल्या आठ दिवसांपासून यवत गावात तळ ठोकून

पालखीच्या स्वागतासाठी यवत नगरी सज्ज झाली आहे. पिठलं भाकरीची ६० वर्षांपासून चालत आलेली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.
— समीर दोरगे सरपंच यवत

बोरीभडक येथे स्वागतासाठी माजी आमदार रमेश थोरात, युवा नेते तुषार थोरात, वैशाली नागवडे , प्रदेश प्रवक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस, तात्या ताम्हाणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष, पोपट ताकवणे, काॅंग्रेसचे विठ्ठल दोरगे व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0