Suspended Leader of Opposition : सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन ऑफ महाराष्ट्र असा उल्लेख, इंस्टाग्राम बायो अंबादास दानवे
Suspended Leader of Opposition : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या इंस्टाग्राम बायो बदलला,सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन ऑफ महाराष्ट्र असा उल्लेख
मुंबई :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सभागृहात शिवीगाळ प्रकरणी निलंबन झाल्यानंतर Suspended Leader of Opposition अंबादास दानवे Ambadas Danve यांनी आपला इंस्टाग्राम बायो बदलला आहे. सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन ऑफ महाराष्ट्र असा उल्लेख त्यांनी त्यांच्या बायोमध्ये केला आहे. विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड आणि दानवे यांच्या शाब्दिक चकमक झाली. ज्याचे रूपांतर शिवीगाळमध्ये झाले. त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेच्या राजीनामाचा ठराव विधान परिषदेत मांडण्यात आला त्यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते.
सस्पेंडेड लीडर असा उल्लेख
निलंबन झाल्यांनतर दानवेंच्या बायोमध्ये सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन महाराष्ट्र असा उत्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर दानवे यांनी निलंबन मागे घेण्याबाबत उपसभापती नीलम गो-हे यांना दिलगिरीचे पत्र दिले होते. आता पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नेमके प्रकरण काय?
राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदूविरोधी वक्तव्यावरून सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहात वाद झाला. त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना पाचअक्षरी शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतरही ते शिवीगाळीवर ठाम होते. एवढेच नव्हे तर सभागृहाबाहेर लाड यांना ‘प्रसाद’ देऊ, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. दानवेंच्या वक्तव्यावर माता-बहिणींची माफी मागतो, असे ते म्हणाले. त्यानंतर 18 तासांनी दानवेंनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करणारे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे यांना ३ जुलै रोजी सकाळी पाठवले. त्यात निलंबनाचा फेरविचार करावा, निलंबन रद्द करावे, अशी मागणी केली.