मुंबई

Mumbai NCP Party : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुंबईकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष ; अजित पवार गटाच्या नेत्यांचा आरोप

Babanrao Madne On Mumbai NCP Party : मुंबईत राष्ट्रवादीचा विकास न होण्यामागे पक्षश्रेष्ठी जबाबदार, लोकसभा, विधान परिषद पक्षाला मोठी जबाबदारी नाही महायुतीत राहून सावत्र वागणूक, राष्ट्रवादी नेते बबनराव मदने यांचा आरोप

मुंबई :- लोकसभा आणि विधान परिषदेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Party) गटाच्या नेत्यांकडून खदखद व्यक्त करण्यात आली आहे. महायुतीत राहून सावत्र वागणूक देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी नेते बबनराव मदने (Babanrao Madne) यांनी आरोप केला आहे. शिक्षक मतदार संघात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे काम असतानाच महायुतीच्या नेत्यांकडून उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळी आली आहे. सातत्याने महायुतीच्या धर्माच्या नावाने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (Mumbai NCP Party) सावत्र वागणूक देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या मुंबई नेत्यांकडून केला जात आहे. Mumbai NCP Party Latest News

वरिष्ठ नेत्यांकडून मुंबईकडे दुर्लक्ष ; बबनराव मदने

आज दुर्दैवाने सांगावसे वाटते मुंबई मध्ये आज शिक्षक मतदार संघात जो निकाल लागला त्याच आश्चर्य बिलकूल वाटत नाही
जे काम गेली 25 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले ते मनापासून केले यात मुळीच शकां नाही. परंतू वाईट एका गोष्टीचे निश्चित वाटते .या निवडणुकीत वरीष्ठ नेते मंडळी यांचे कुठेही सहकार्य मार्गदर्शन या आपल्या उमेदवाराच्या पाठीशी जी वरीष्ठ नेत्यांकडून पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून जी ताकद लावायला पाहिजे होती .ती कुठेही लावताना दिसून आली नाही.हे दुर्दैवाने सांगावसे वाटते.खरे पाहता एकटे शिवाजीराव नलावडे साहेब त्यांच्या बळावर आपल्या कार्यालयासह किल्ला लढवताना दिसत होते. परतूं खरे पहाता मुंबई कडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पक्ष स्थापनेपासून दुर्लक्षच केले आहे.आणि आज अजितदादा पवार यांच्या बरोबर आपन सर्व निश्चित आलो आहे.परंतू मुंबई मध्ये आपन लोकसभेला महायुतीचा धर्म पाळून आपला एकही उमेदवार नसताना आपन सर्वांनी खूप मेहनत घेतली.प्रमाणिक पणे काम केले.परंतू या शिक्षक मतदार संघासाठी महायुतीने मोठे मन करुन आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिलाच पाहिजे होता.किंबहूना महायुतीचा आपला एकच उमेदवार उभा असायला पाहिजे होता.परंतू दुर्दैवाने तसे झाले नाही की आपल्या वरीष्ठ नेत्यांनी तसा प्रयत्न सुद्धा करताना फारसे दिसत नव्हते .
हे सर्व किती काळ आपन सहन करत राहणार ? मुंबई मध्ये आता आम्हाला 25 वर्षे झाली ? पक्ष श्रेष्ठी अजून आमचा मुंबईकरांचा किती अंत पाहणार ? यावर निश्चित विचार झाला पाहिजे कार्यकर्ते नैराश्येच्या छायेत आहे .

यांचा विचार करून योग्य ती पावले उचलावी नाहीतर विधानसभा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची अवस्था फार कठिण होवून जाईल .मुंबई मधून 6 खासदार 36 आमदार निवडून येतात आणि 227 नगरसेवक तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरीष्ठ नेत्यांचे मुंबई कडे दुर्लक्ष हि फार खेदाची बाब आहे. अशी खाजगीत राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत कशाप्रकारे जागा मिळणार आहे हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0