Jitendra Awhad : ठाण्याच्या येऊर मध्ये रेव्ह पार्टी जितेंद्र आव्हाड यांचा आरोप..
•विश्वचषक अंतिम सामन्यात ठाण्याच्या येऊर मध्ये रेव्ह पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार Jitendra Awhad यांचा सरकारवर गंभीर आरोप
ठाणे :- येऊर येथील एका हॉटेलमध्ये T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामना पाहण्यासाठी हॉटेल आलेल्या प्रेक्षकांना तसेच हॉटेलमधील तरुण-तरुणांकरिता रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गंभीर आरोप केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केलं सरकारवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे येऊरमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये रेव्हा पार्टी करण्यात आल्याचा आरोप केला. येऊरच्या हॉटेलमध्ये क्रिकेट विश्वचषकातील विजयाच्या नावाखाली रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सर्व प्रकारचे ड्रग्ज उपलब्ध होते. अनेक मोठ्या ड्रग्ज पेडलर्सचा या पार्टीत मुक्तसंचार सुरू होता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. प्रशासन व सदर हॉटेल मालकाचे साटेलोटे आहे. मी हा मुद्दा विधानसभेतही मांडणार आहे. ते हॉटेल कुणाचे आहे? आणि त्या हॉटेल मालकाला कसे वाचवले जात आहे? हे ही मी सांगणार आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी विश्वचषक सामना जिंकल्यानंतर तेथील हॉटेल विरूद्ध स्थानिकांनी केलेल्या तक्रारी विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले होते.
काल रात्री कानठळ्या बसवणारा आवाज, वाहतूक कोंडी, मद्यपी वाहनचालक आणि प्रचंड गोंधळामुळे येऊर येथील आदिवासींना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. रात्री 12 वाजता आमचे आदिवासी बांधव आणि माता-भगिनी लहान मुलांसह हॉटेल बंद करा, आवाज बंद करा आणि वाहनकोंडी सोडवा अशी मागणी करत होते. मात्र, ठाणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी धनाढ्य हॉटेल मालकांना संरक्षण देत आदिवासींवरच खोटे आरोप लावून त्यांना धमकावण्याचं पाप केलं. महाराष्ट्र सरकारने हे जंगल श्रीमंतांना विकले आहे. येऊरमधील बेकायदा बार आणि लाउंजवर कारवाई कधी होणार?
वनविभाग, ठाणे पोलीस आणि महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रात्री आणि पहाटे येऊर रस्त्यावर फिरणाऱ्या मद्यधुंद लोकांमुळे आदिवासी महिलांना असुरक्षित वाटते, येऊरच्या आमच्या माता-भगिनींनी हा त्रास का सहन करावा? या हॉटेल्समधील स्पीकर्सच्या दणदणाटामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. हे ताबडतोब थांबण्याची गरज आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे, मग त्यांनी येऊरमधील बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय देण्याचा निर्णय का घेतलाय? यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, ज्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा ते प्रयत्न करतायंत?
गेल्या काही दिवसांपासूनच येऊन येथील स्थानिक लोकांचा पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर विरोध आहे कारण येथील पर्यटन मोठ्या प्रमाणावर येथे येऊन पार्ट्या तसेच धिंगाणे घालतात त्यामुळे येथील नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहे.