मुंबई

Navi Mumbai Municipal Corporation : नवी मुंबई महापालिकेची शहर भर कारवाई दिघा विभागात मात्र अधिकारी झोपेत…

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात बार, Navi Mumbai Bar हॉटेल, पब, हुक्का पार्लर व्यवसायिकांच्या अनधिकृत बांधकामावर पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे Navi Mumbai Municipal Corporation यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे Rahul यांच्या नियंत्रणाखाली रविवारी रात्रभर कारवाईचा सपाटा सुरू आहे. मात्र दिघा वॉर्ड ऑफिस Digha Ward Office अंतर्गत एकही कारवाई सुरू नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हॉटेल रॉयल पार्क याने नाव बदलून बाहेर मार्जिनल स्पेसवर लाईटीचा झगमगाट सुरू ठेवला आहे. तर पदपथ तोडून अनधिकृपणे बाहेर गेट देखील उभारला आहे. श्रीकृष्ण हॉटेलने टेरेसवर शेड टाकून अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केला आहे. तर संपूर्ण ईश्वरनगरमध्ये अनधिकृतपणे चायनीज कॉर्नर आणि बिर्याणीची दुकाने सुरू आहेत. (कोणताही व्यावसायिक परवाना नाही तर रोड टच घरात अर्ध्या दुकान बनवले आहे), विष्णुनगर रोड, दिघा बाबा मंदिराच्या “दुतर्फा”, माजी नगरसेवक नवीन गवते यांच्या कार्यालयासमोर दुमजली कोकण किनारा हॉटेल अनधिकृत पणे सुरू आहे. Navi Mumbai Municipal Corporation

अतिक्रमण अधिकारी राहुल गेठे यांना दिघा विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर कैलाश गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली नसल्याने लपावाछपी केल्याची चर्चा* सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे परिमंडळाचा अतिरिक्त कारभार सहाय्यक आयुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांना देण्यात आला आहे. परंतु त्याच्या दिघा विभागातच बिंनधास्तपणे विनापरवाना आणि अनधिकृतपणे बांधकाम केलेली हॉटेल सुरू आहेत. शहरात रात्रभर कारवाई सुरू असताना दिघा विभागात मात्र एकाही ठिकाणी हातोडा न पडल्याने पालिकेने कारवाईत “अशी ही बनवाबनवी” केल्याचे दिसत आहे. Navi Mumbai Municipal Corporation

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0