Pune Crime News : ती चहा मध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेला लुटायची..
Pune Crime News Pune Bibewadi Police Arrested Women For Robbing People : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी ; चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी केले अटक, नोकरी देतो असे सांगून महिलांची करत होते लूट..
पुणे :- घरकाम करणाऱ्या महिलेला लक्ष करून त्यांना काम देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात असे त्यानंतर चहा मध्ये गुंगीच्या औषध टाकून महिलांना लुटत असे अशा बंटी बबली च्या जोडीला पुण्याच्या बिबडेवाडी पोलिसांनी Pune Bibewadi Police अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोन आरोपींना अटक केली आहे. Pune Crime News
महिला विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार
पोलिसांकडे 12 जून रोजी दुपारी साडेबारा ते रात्री साडेदहाच्या दरम्यान एका महिलेने भारत ज्योती बस स्टॉप बिबडेवाडी येथे तुला काम मिळून देते असे सांगून त्या महिलेला लक्ष्मी रोड येथून घेऊन जाऊन तिच्या घरी नेले तिच्या चहामध्ये गुंगी आणणारे औषध टाकून तिला बेशुद्ध करून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने मोबाईल फोन काढून तिला बेशुद्ध अवस्थेत फुरसुंगी येथे सोडले. तसेच एका महिलेला काम करून देते म्हणून कुठे घेऊन जाऊन चहा मध्ये गुंगी च्या औषध टाकून गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने काढून घेऊन तिला कर्वेनगर पुणे येथे बेशुद्ध अवस्थेत सोडून तिथून निघून गेले या दोन्ही महिलेने बिबडेवाडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 328,392,363 गुन्हा दाखल करण्यात आला होता. Pune Crime News
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध
महिलेचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या ठिकाणापासून ते आरोपीने महिलेने नेलेल्या ठिकाणापर्यंत 50 ते 60 सीसीटीव्हीचे कॅमेरे चेक करत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी महिलेचा आणि तिच्या साथीदाराचा शोध घेतला. आरोपी महिलेला अटक केली असून त्या महिलेचे नाव सुषमा बाळासो भोसले आणि तिचा साथीदार विकास वासुदेव पाठक (58 वर्ष) यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता तपासाबाबत त्यांनी खुलासा करत 12 जून रोजी फिर्यादी महिलेला विकास पाठक यांच्या घरी नेऊन त्यांना गुंगेच्या औषध देऊन त्यांच्या अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेऊन दोघींना बेशुद्ध अवस्थेत फुरसिंग येथे सोडून दिले तसेच साक्षीदार आशा मळेकर यांना 10 जून रोजी काम देण्याच्या बहाण्याने घरी नेऊन तिच्या अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेऊन त्या दोघींना बेशुद्ध अवस्थेत कर्वेनगर पुणे येथे सोडून दिल्याचे कबुली केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील दोन लाख 4 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मोटरसायकल आणि मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडतेस आणला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे यांच्याशी संपर्क करावा असे सांगण्यात आले आहे. Pune Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar ,सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,पोलीस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ -05 पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, शाम लोहोमकर, संतोष जाधव, पोलीस अमंलदार शिवाजी येवले, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, मेघा गायकवाड यांनी केली आहे. Pune Crime News