Maharashtra Politics : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध घोषणाबाजी
•Maharashtra Politics खोके सरकार, कमिशन सरकार, भ्रष्टाचारी सरकार.. अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात दिल्या
मुंबई :- राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईच्या विधिमंडळात चालू झाले आहे. या अधिवेशनापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच विरोधकांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. कमिशन सरकार… खोके सरकार… भ्रष्ट सरकार अशी घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिवरायांना अभिवादन केले तेव्हा या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अधिवेशनापूर्वी अजित पवारांचे ट्विट..
आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदाच्या ह्या अधिवेशनात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला प्रगतीपथावर वेगानं पुढे घेऊन जाणारे तसंच सर्व समाजघटकाच्या हिताचे सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील असा विश्वास देतो.