Raj Thackeray New Look : अमेरिकेत राज ठाकरे यांचे हटके लूक, नितीन सरदेसाई यांनी केला फोटो शेअर
•Raj Thackeray New Look राज ठाकरे सहकुटुंब अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात सहभागी
मुंबई:- अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाने अधिवेशन भरवले आहे. या अधिवेशनाला जगभरातून अनेक मराठी दिग्गज व्यक्तीगण येथे येत असतात यंदाचे अधिवेशनाचे दुसरे पर्व आहे. या अधिवेशनाला खास वक्ते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे आपल्या सहकुटुंब तसेच त्यांचे सहकारी नितीन सरदेसाई इतर नेत्यांसोबत उपस्थित राहिले आहे. राज ठाकरे यांचा जीन्स पॅन्ट आणि हुडी घातलेला फोटो नितीन सरदेसाई यांनी शेअर केला आहे.
सान होजे येथील मेरियट हॉटेलमध्ये राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली आणि नातू कियान ठाकरे पोहचले. त्यावेळी संमेलनाचे मुख्य संयोजक प्रकाश भालेराव आणि सुजाता भालेराव यांनी राज ठाकरे-शर्मिला ठाकरे यांचे औक्षण करत मराठमोळं स्वागत केले. तर बृन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी मंत्रोच्चाराने त्यांचे स्वागत करताना व्हिडिओत पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सगळेच सदस्य खूप उत्सुक होते. त्याचसोबत हॉटेलमधील इतर लोकही मराठमोळ्या पद्धतीचं स्वागत पाहून भारावून गेले.Apple, META आणि गुगलच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सान होजे कन्व्हेक्शन सेंटरच्या हॉलमध्ये उत्तर अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गुरुवारपासून सुरूवात होत आहे. भारताबाहेरच्या या सर्वात मोठ्या संमेलनात मराठी कला, संस्कृती, परंपरा आणइ आणि पुरणपोळीपासून कडक चहापर्यंत खाण्यापिण्याची लयलूट आहे.