Sanjay Raut : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते नाव घोषित झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, भाजपवर निशाणा
Sanjay Raut On Rahul Gandhi : राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नाव घोषित करण्यात आले आहे. आता काँग्रेसच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई :- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Rahul Gandhi लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. पक्षाच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी Soniya Gandhi यांनी लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र पाठवून यासंदर्भात पक्षाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. यावर आता उद्धव गटाचे खासदार आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत Sanjay Raut यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
संजय राऊत म्हणाले, “आमचे राहुल गांधी आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. धन्यवाद राहुलजी! हे संवैधानिक पद स्वीकारून तुम्ही देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही सर्व मिळून लढा देऊ आणि जिंकू.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची घोषणा केली. विरोधी पक्षांच्या बैठकीत लोकसभा अध्यक्ष निवडीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे आहे, हे विशेष. संवैधानिक पदे आणि संसदीय समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका असते. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत मंगळवारी सायंकाळी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर राहुल गांधी यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे आले.